पंकज विष्णू साकारणार भगवान शंकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘स्टार प्रवाह’वर 22 ऑगस्टपासून सुरू होणाऱया ‘देवा श्री गणेशा’ मालिकेची कमालीची उत्सुवता आहे. या मालिकेतल्या गणपती बाप्पा आणि माता पार्वतीचा लूक याआधीच समोर आहे. भगवान शंकराची भूमिका कोण साकारणार याविषयी कुतूहल होते. शंकराची भूमिका अभिनेता पंकज विष्णू साकारणार आहे. या पौराणिक मालिकेतील भूमिकेविषयी ते म्हणाले, ‘गणेशचतुर्थीपासून सुरू होणाऱया या मालिकेत शंकराची भूमिका साकारायला मिळणे हे माझे भाग्यचं आहे. मी खूप वर्षांनंतर मराठी मालिकेत काम करत आहे. त्यामुळे प्रचंड उत्सुव आहे. कोणतंही पात्र साकारताना ते पूर्णपणे समजून घेणं गरजेचं आहे. शिवशंकराला आपण भोलेनाथ म्हणतो. तो जसा भोळा आहे तसाच त्याचा रौद्र अवतारही पाहायला मिळतो. त्यामुळे भोलेनाथाच्या या दोन्ही छटा मालिकेत साकारणे माझ्यासाठी नवे आव्हान असणार आहे.