दिलासादायक! जिल्ह्यात 64 रूग्णांची वाढ; 4238 रुग्णांवर उपचार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगर जिल्ह्यात आज एकूण ६४ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८८५३ झाली आहे. आजपर्यंत १४२१७ (७५.४१ टक्के) कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून, एकूण ५९५ (०३.१६ टक्के) जणांचा मृत्यू झाल्याने आता एकूण ४०४१ ( २१.४३ टक्के) रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सकाळनंतर ५२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर एक, ग्रामीण भागात १४ रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

ग्रामीण भागात ४७ रुग्ण
ग्रामीण भागात आज ४७ नवीन रुग्ण आढळून आले. यामध्ये पळशी, सोयगाव (१),अजिंठा (१), साजापूर, बजाजनगर (१), सलामपूर, वडगाव (१), सिडको, म्हाडा, बजाजनगर (३), बजाजनगर (१), स्वामी समर्थ, बजाजनगर (१), इंदिरानगर, पंढरपूर (२), सरस्वती सो., बजाजनगर (१), कायगाव, गंगापूर (१), बाबाजी मंदिर, बोरसर (१), हनुमाननगर, अजिंठा (५), परदेशी गल्ली, वैजापूर (२), कुलकर्णी गल्ली, वैजापूर (१), शांतीनगर, वैजापूर (१), पाचीपीरवाडी (१), संभाजीनगर (६), फुलंब्री (१), गंगापूर (२), कन्नड (१),सिल्लोड (१), पैठण (३), जामगाव रोड, गंगापूर (७), विठ्ठल मंदिर परिसर, गंगापूर (१), पाण्याच्या टाकीजवळ, सिल्लोड (१)

मनपा क्षेत्रात १६ रुग्ण
मनपा क्षेत्रात आज १६ रुग्ण आढळून आले. यामध्ये बन्सीलालनगर (१), पोलिस कॉलनी, मिलकॉर्नर (१), सातारा परिसर (१), घाटी परिसर (३), मिटमिटा, पडेगाव (१), फुलेनगर, गुरुगोविंदसिंगपुरा (१), दशमेशनगर (१), अन्य (१), महा कॉलनी (१), शिवाजीनगर (१), पडेगाव (३), बालकृष्णनगर (१) सिटी एंट्री पॉइंट (१) गजानन नगर, गारखेडा (१)

कोरोनाने घेतला ३ वर्षांच्या चिमुकल्याचा बळी

या चिमुकल्यास ताप, खोकला, असल्याच्या कारणावरून १४ ऑगस्ट रोजी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भरती करताच त्याचा स्वाब घेऊन प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. त्यात तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरू होते. दरमुख्यान रविवारी दुपारी १२ च्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या चिमुकल्याचा मृत्यू डिस्सेमिनेटेड इंट्राव्हास्क्यूलर कोएगुलेशन विथ पल्मनरी हिमोरेज विथ सेप्टिक शॉक विथ पायोमेनिंजायटीस विथ कोव्हीड १९ पॉझिटिव्ह विथ रिकेटशियल फिवर या कारनामे झाल्याचे घाटीच्या सूत्रांनी सांगितले

जिल्ह्यात दुपारपर्यंत ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू

संभाजीनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा मृत्यूचे तांडव थांबता थांबत नाही. आगेल्या २४ तासांत जिल्ह्यात ८एक तीन वर्षांच्या चिमुकल्यासह आठ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबरोबरच घाटीतील मृत्यूची संख्या ४४५ वर पोहोचल्याची माहिती घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.