
‘मुलाच्या भविष्यासाठी स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी झटणाऱ्या बापाला सलाम. अशीच स्वप्ने देशाला पुढे घेऊन जातात. आमची संस्था एमपीच्या आशिषचा पुढील सर्व शिक्षणाचा खर्च उचलत आहे.’ असे सांगत आनंद महिंद्रा यांनी धारमधील 105 किमी सायकल रपेट करीत मुलाला 10वीच्या परीक्षा केंद्राकर पोचवणाऱया शोभाराम यांच्या कुटुंबाशी संपर्क करण्यासाठी पत्रकारांची मदत मागितली आहे.
महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल नेटवर्किंगकर सतत अॅक्टीव्ह असतात. अगदी व्हाॅट्सअॅपवर येणाऱया फोटोंपासून सुविचारांपर्यंत अन् वेगवेगळ्या कल्पना ते ट्विटवरुन शेअर करतात. त्यांनी केलेले ट्विट व्हायरल झाल्याचे अनेकदा पहायला मिळते. सोशल मीडियावरुन समोर आलेल्यांना त्यांनी मदतीचा हातही अनेकदा दिला आहे. असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. आनंद महिंद्रा यांनी मध्य प्रदेशमधील एका जिद्दी पित्याची मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या पित्याने लॉकडाउनमध्ये बापाचे कर्तव्य बजावत मुलाच्या परीक्षेसाठी तब्बल 105 किमी सायकल चालवली. मध्य प्रदेशमधील धार जिह्यातील हा पिता आहे.सोशल मीडियावर या आदर्श पित्याचे कौतुक सुरु असताना आंनंद मंहिद्रा यांनी कौतुक तर केलेच शिवाय त्याच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारीहि स्वीकारली. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत याची माहिती दिली. या निर्णयामुळे नेटकऱयांनी आनंद महिंद्रा यांच्याकर कौतुकांचा वर्षाव केला आहे.
जिद्दी पिता शोभाराम
मध्यप्रदेशच्या धार जिह्यातील बायडीपूर हे दुर्गम भागातील गाव. त्या गावातील शोभाराम या पित्याने आपल्या मुलाला एसएससी परीक्षेत तीन विषयांची फेरपरीक्षा देण्यासाठी चक्क 105 किमी सायकल रपेट करीत शहरात नेले. शिवाय तीन दिवस मुलगा आशिषसोबत 3 दिवसांचे रेशनपाणी सोबत घेत धार शहरात मुक्काम केला.मुलाच्या शिक्षणासाठी कठोर परिश्रम घेणाऱया आणि विद्येचा आदर करणाऱया शोभारामची बातमी वाचून आनंद महिंद्रा अतिशय प्रभावित झालेत. त्यांनी शोभारामच्या मुलाच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलण्याची घोषणाही सोशल साईट्सवर केली आहे.
























































