नोकरीच्या पहिल्याच दिवशी करायच्या हात सफाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोकरीच्या पहिल्याच दिवशी हातसफाई करणाऱ्या दोन मोलकरणीना अंबोली पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. वनिता गायकवाड आणि अनिता शिंदे अशी त्या दोघींची नावे आहेत. त्या दोघीना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. जोगेश्वरी परिसरात एक व्यावसायिक राहतात. त्यांना घरकामासाठी मोलकरीण हवी होती. गेल्या आठवडयात एका जणाच्या ओळखीने त्या दोघी व्यावसायिकाच्या घरी घर कामासाठी गेल्या. बेड रूम मध्ये साफ सफाई करत असताना कपाटाला चावी असल्याचे त्या दोघीच्या निदर्शनास आले. त्या दोघीनी कपाटातून 8 लाखांचे दागिने चोरले. काम झाल्याचा बहाणा करून त्या दोघी निघून गेल्या. काही वेळाने व्यावसायिकाची पत्नी बेड रूम मध्ये गेली, तेव्हाकरणाऱ्या व्हा तिला कपाट अर्धवट उघडलेले दिसले. तिला संशय आला. तिने कपाट उघडले तेव्हा त्यात सोन्याचे दागिने नव्हते. दागिने चोरीला गेल्याने त्यानी अंबोली पोलीस ठाण्यात धाव घेतली.