
मुंबईतील सकाळी बॉम्बस्फोटांचा सूत्रधार, अंडरवल्र्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीत असल्याचा पत्ता जाहीर करणाऱ्या पाकड्यांनी 24 तासांच्या आत पलटी मारली आहे. दाऊद आमच्याकडे नाही असे पाकच्या परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, दहशतवादी पोसणाऱ्या पाकचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.
पाकिस्तान सरकारने शनिवारी 88 दहशतवादी संघटना, व्यक्तींवर बंदी घातली अशी माहिती असलेली एक यादीच प्रसिद्ध केली. यात दाऊद इब्राहिम, जमात-उद-दवाचा म्होरक्या आणि मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मदचा सूत्रधार मौलाना मसूद अजहरचा समावेश आहे. दहशतवाद्यांची बँक खाती गोठविण्यात येत असल्याचा उल्लेख आहे.
पत्ताही दिला होता
1990 च्या सुमारास दाऊद इब्राहिम दुबईला पळाला. 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर त्याला पाकिस्तानने आश्रय दिला. हिंदुस्थानातील अनेक बॉम्बस्फोटांमध्ये दहशतवाद्यांना दाऊदने फंडिंग केले आहे. याबाबतचे अनेक पुरावे हिंदुस्थानने पाकिस्तान सरकारला दिले आहेत. पण आजपर्यंत पाकड्यांच्या मान्य केले नव्हते. शनिवारी मात्र पाकने कबुली दिली होती.
शनिवारी पाकड्यांनी
दाऊदचा पत्ताच दिला होता. ‘व्हाईट हाऊस, सौदी मशीदजवळ, क्लिफ्टन’ असा पत्ता दिला होता. आज घुमजाव करताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दाऊद पाकिस्तानात नाही. हिंदुस्थानी मीडियातील वृत्त निराधार असल्याचे म्हटले आहे.


























































