जमीन व्यवहार धमकावून उकळली पावणेतीन लाखांची खंडणी; पत्रकारासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जमीन व्यवहारात धमकावून खंडणी उकळल्याप्रकरणी एका पत्रकारासह दोघांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2015 ते 2019 कालावधीत घडली. पत्रकार देवेंद्र जैन आणि सद्दाम उर्फ दत्तात्रय उर्फ बाळासाहेब गुलाबराव कामठे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मोहन राजू बहिरट (वय 26, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कामठेला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू यांच्या आजोबांनी शेवळेवाडी येथील जमीन विक्रीसाठी काढली होती. त्यावेळी एकाने ही जमीन खरेदी केली होती. मात्र, सद्दाम याने खरेदीदार यांना हा व्यवहार माझ्या मार्फतीने करावा लागेल. अन्यथा व्यवहार होऊ देणार नाही असे धमकावले. भीतीमुळे राजू यांनी 2 लाख 70 हजार रुपये कामठेला दिले. त्यानंतरही 7/12 हरकतीचा अर्ज करुन त्याने खरेदीदार आणि राजूला 25 लाख रुपयांची खंडणी मागितली.

पत्रकार देवेंद्र जैनने गेल्या वर्षी जून महिन्यात एका वृत्तपत्रात जमिनीबाबत अवैध उत्खनन पाण्याचा नैसर्गिक प्रवाहास अडथळा अशा खोट्या बातम्या देऊन बदनामी केली केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्याशिवाय राजू मिळकत जमिनीवर गेले असता त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सद्दाम याला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.