ऑनलाईन प्रवेशासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत, 25 टक्के कोटा प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत 25 टक्के कोट्याच्या ऑनलाईन प्रवेशासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 25 टक्के प्रवेशासाठी मार्च महिन्यात पहिली सोडत काढण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे प्रवेश कन्फर्म झाले नाहीत. आता 31 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश कन्फर्म करता येणार आहेत तसेच आवश्यक कागदपत्रे देखील ऑनलाईन सादर करता येणार आहेत.

वंचित घटक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 25 टक्के कोट्याद्वारे खासगी शाळेत प्रवेश दिला जातो. पहिल्या सोडतीत ज्या विद्यार्थ्यांना शाळा अलॉट झाली आहे अशा विद्याथ्र्यांच्या पालकांना शाळेचा ईमेल आयडी किंवा व्हॉट्सअॅपवर आवश्यक कागदपत्रे पाठवायची आहेत. लॉकडाऊनमुळे शाळा बंद होत्या त्यामुळे सोडतीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही. आतादेखील विद्याथ्र्यांना कागदपत्रे जमा करण्यासाठी शाळेत जाण्याची गरज नाही. आता ऑनलाईन प्रवेश घेतल्यानंतर शाळा सुरू झाल्यावर कागदपञांची पडताळणी केला जाईल त्यानंतरच विद्याथ्र्यांचा प्रवेश कन्फर्म होणार आहे. 31 ऑगस्टनंतर प्रतिक्षा यादीतील विद्याथ्र्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे.

प्रवेशाची स्थिती

शाळा 297
प्रवेश क्षमता 5673
प्रवेश अर्ज 12,402
प्रवेश मिळाले 4053