
नीट आणि जेईई परीक्षेवरून देशातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षांना विरोध दर्शवत आंदोलन छेडलं आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे, तर सत्ताधारी पक्षाचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील विद्यार्थ्यांची बाजू घेत आपली अवस्था विदूरासारखी झाल्याचे म्हटले आहे.
In the NEET and JEE exam matter today, are students like Draupadi being disrobed? CMs can play the role of Krishna. All my experience as a student and then Professor for 60 years tells me something wrong has been scheduled. I feel like Vidura.
— Subramanian Swamy (@Swamy39) August 28, 2020
सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘आज नीट आणि जेईई परीक्षेच्या बाबतीत विद्यार्थ्यांना द्रौपदीप्रमाणे अपमानित केले जात आहे? मुख्यमंत्री कृष्णाची भूमिका निभावू शकतात. आधी विद्यार्थी आणि नंतर 60 वर्षे प्राध्यापक म्हणून माझे अनुभव काहीतरी चुकीचे होणार असल्याचे सूचवत आहे. मला विदुर सारखे वाटत आहे. ‘
अभियांत्रिकी व वैद्यकीयसाठी घेण्यात येणाऱ्या जेईई व नीटच्या प्रवेश परीक्षा ठरलेल्या वेळेवरच घेण्यात येतील. त्यात कोणताही बदल होणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षानेही सरकारला फटकारले आहे.
NEET परीक्षा पुढे न ढकलल्यास विद्यार्थी आत्महत्यांचे लोण पसरेल, भाजप खासदाराने दिला इशारा
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर नीट आणि जेईई परीक्षांच्या विरोधात आंदोलन छेडलं आहे. #SpeakUpForStudentSafety असा हॅशटॅग वापरत त्यांनी आवाज उठवला आहे. लाखों विद्यार्थ्यांसोबत आपणही त्यांच्या आवाज बुलंद करा, सरकारने विद्यार्थ्यांचा आवाज ऐकावा यासाठी हे आंदोलन छेडल्याचे राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
Unite your voice with lakhs of suffering students. #SpeakUpForStudentSafety from 10am onwards.
Let’s make the Govt listen to the students.लाखों परेशान छात्रों के साथ अपनी आवाज़ जोड़िए। #SpeakUpForStudentSafety आज 10 बजे से।
आइए, सरकार से छात्रों की बात सुनने की माँग करें। pic.twitter.com/NBri5lx8Ff— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 28, 2020
























































