
आतापर्यंत बाजारात फक्त महिलांसाठी बिकीनी मिळायची. मात्र आता पुरुषांसाठीही खास बिकीनी तयार करण्यात आली आहे. पुरुषांसाठी बिकीनी कशी अशा विचारात पडला असाल तर ही विशेष ब्रोकिनी थेट बिकीनी (टु पीस) प्रकारातली नसून मोनोकिनी (सिंगल पीस)चा एक प्रकार आहे.
टोरोंटोमधील दोन तरुण चड सास्को आणि टेलर फिल्ड यांनी ही ब्रोकिनी बाजारात आणली आहे. 15 जुलैला या दोघांनी हा ब्रँड बाजारात आणला असून या ब्रँडला परदेशात चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. या एका ब्रोकिनीची किंमत तब्बल 45 डॉलर्स इतकी आहे.

























































