
भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरलेला बिबट्या तारेमध्ये अडकल्याची घटना सकाळी लांजा शहरातील खावाडकरवाडीमध्ये घडली. दरम्यान वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याची यशस्वी सुटका केली. त्यानंतर त्याला चांदोली येथील अभयारण्यात सोडण्यात आले.
लांजा खावाडकरवाडीमध्ये चंद्रकांत गुरव यांच्या घराशेजारील भात शेतीला लागून असलेल्या कुंपणाच्या तारेमथ्ये बिबट्या अडकला होता. वन विभागाने प्रसंगावधान राखून तासाभरात बिबट्याची तारेतून सुटका केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
हे बचाव कार्य विभागीय वन अधिकारी र. शी. भवर यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगड, सागर पाताड, सुरेश उपरे, वनरक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पार पडले.
पाहा या सुटकेचा थरारक व्हिडीओ-























































