राज्यात इ पासची अट रद्द, अनलॉक 4 ची गाईडलाईन्स जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इतर जिल्ह्यात जाण्यासाठी आता इ पासची गरज लागणार नाही. राज्य सरकारने नवीन गाईडलाईन्स जारी करून इ पासची अट रद्द केली आहे. तसेच अनलॉक 4 मध्ये हॉटेल उघडण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

राज्य सरकारने आज अनलॉक 4 च्या सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यासाठी कुठल्याही परवान्याची गरज नसणार आहे. केंद्र सरकारने यापूर्वी इ पास रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राज्याचे ही अट रद्द केली आहे. खासगी बस आणि वाहतूकही अनलॉकमध्ये सुरू राहतील. तसेच राज्यातील आता हॉटेल्स, लॉज 100 टक्के सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच दारूची दुकानेही सुरू राहतील.

अनलॉक 4 मध्ये शाळा कॉलेज, व्यायाम शाळा बंद राहतील. तर शासकीय आणि खासगी कार्यालये ही 30 टक्के प्रमाणात सुरू राहतील. लग्न समरंभांना 50 व्यक्तींची अट अनलॉक 4 मध्ये कायम आहे.