
महावितरण, महानिर्मिती आणि महापरेषण या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये काम करणाऱ्य़ा वीज कामगारांना खुशखबर आहे. सेवा काळात एखाद्या वीज कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 20 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी म्हणून गटविमा काढण्यात येणार आहे, त्यासाठी वीज कंपन्यांनी विमा कंपन्यांकडुन टेंडर मागवले आहे.
राज्य सरकारची मालकी असलेल्या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये जवळपास 75 हजार नियमित वीज कामगार कार्यरत आहेत. एखाद्या कर्मचाऱ्य़ाचा सेवा काळात अपघाती मृत्यू झाल्यास आतापर्यंत दहा लाख रुपयांचा विमा त्याच्या कुटुंबियांना मिळत होता. मात्र नव्याने वेतन करार करताना सेवा काळात एखाद्या कर्मचाऱ्य़ाचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 20 लाख रुपयांचा विमा मिळावा अशी मागणी केली होती. त्यानुसार वीज कंपन्यांनी 20 लाख रुपयांच्या गट विम्यासाठी विमा कंपन्यांकडून टेंडर मागवले आहे. त्यामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.




























































