
एसटी महामंडळात सरळसेवा भरती-2019 अंतर्गत सेवेत नेमणूक झालेल्या चालक आणि वाहकांसह इतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या कर्मचाNयांच्या सेवेस देण्यात आलेली तात्पुरती स्थगिती एसटी महामंडळाने उठवली आहे.
महामहामंडळाने 17 जुलै रोजी रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची सेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. 2019 मध्ये सरळसेवा भरती अंतर्गत चालक व वाहक पदामध्ये रोजंदार गटामध्ये नेमणूक देण्यात आलेल्या साडे चार हजार कर्मचाऱ्यांच्या सेवा त्यामुळे तात्पुरत्या खंडित झाल्या होत्या. या उमेदवारांपैकी 1300 उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण करून चालक तथा वाहक पदावर नियुक्त्याही दिल्या होत्या. तसेच सुमारे ३२०० चालक आणि वाहक पदाकरीता प्रशिक्षण सुरू होते. तसेच राज्य संवर्ग सुमारे 150 व सुमारे 82 अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू होते.
3200 प्रशिक्षणार्थी अद्यापही वंचित
सरळसेवा भरतीतील कर्तव्यावर हजर झालेल्या 1300 कर्मचान यांची स्थगिती उठविली तसेच अनुकंपा तत्वावरील उमेदवारांच्या प्रशिक्षणावरील स्थगितीचा निर्णय मागे घेतला आहे. परंतु अद्यापही 3200 प्रशिक्षणार्थी तसेच चालक तथा वाहक पदातील 236 महिला उमेदवार वंचित राहणार आहेत.




























































