जालन्यात भरदिवसा दोन सख्या भावांचा खून, जुन्या वादातून घडली घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder-knife

जुन्या वादातून करण्यात आलेल्या जबर हाणामारीत जमावाने दोन सख्या भावांचा खून झाला आहे. ही घटना जालना तालुक्यातील पानशेंद्रा येथे शुक्रवारी सकाळी घडली आहे.

राहुल गौतम बोर्डे (25) व प्रदीप गौतम बोर्डे (21) असे या मयत तरुणांची नावे आहेत. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी पंधरा संशयितांना ताब्यात घेतले आहे. पानशेंद्रा येथील राहुल गौतम बोर्डे यांचे काही दिवसांपूर्वी गावातील काही व्यक्तींसोबत वाद झाला होता. या वादाचा राग धरुन गावातील बारा ते पंधरा जणांनी शुक्रवारी पहाटे राहुल गौतम बोर्डे व त्याचा भाऊ प्रदीप गौतम बोर्डे या दोघांवर प्राणघातक हल्ला करुन काठ्या, दगडाने जबर मारहाण केली.

या मारहाणीत राहुल गौतम बोर्डे याचा जागीच मृत्यू झाला. तर प्रदीप गौतम बोर्डे गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा ही मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधिक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर, तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, त्यांच्यासह तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान याप्रकरणी 15 संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.