
नुकतेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर कुकुडपवार हे 31 ऑगस्टला सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी डॉक्टर अखिल कुरेशी यांची निवड करण्यात आली आहे.
डॉक्टर अकील कुरेशी हे सध्या आयुर्वेदिक दवाखाना कोळशी, तालुका कोरपना येथे कार्यरत आहे. कोळसी गाव चंद्रपूर पासून 80 ते 90 किलोमीटर दूरवर आहे. कुरेशी यांच्या निवडीवरून वाद निर्माण झाला असून जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘कुरेशी यांची यांची निवड ही चुकीची असल्यामुळे ती रद्द करण्यात यावी’, असे नमूद करून महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना यांनी सहसंचालक आरोग्य सेवा नागपूर यांना निवेदन दिले आहे.



























































