बारामुल्लातील चकमकीत 2 दहशतवादी ठार, मेजर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी लष्कराने बारामुल्लाच्या येदिपोरा पट्टन भागात लपून बसलेल्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र या धडक कारवाईत हिंदुस्थानी लष्कराचे रोहित कर्मा गोळी लागून जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लष्कराच्या 92 बेस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामुल्लात तीन कडवे अतिरेकी लपून बसल्याची खबर मिळताच सुरक्षा बलांनी दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाला घेरले. दहशतवाद्यांनी लष्करी पथकावर जोरदार गोळीबार करताच जवानांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्त्युत्तर दिले. त्यात 2 दहशतवादी जागीच ठार झाले. तिसऱया दहशतवाद्याचा शोध सुरू आहे.