
संगमेश्वर तालुक्यातील कोरोना उद्रेकाचा सिलसिला थांबण्याचे नाव नाही. काल रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार तालुक्यात तब्बल 48 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
यातील 25 ते 30 रुग्ण देवरुख परिसरातील असून उर्वरित तालुक्याच्या इतर गावातील आहेत. तालुक्यातुन काल 108 अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यात एव्हढ्या मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली आहेत. रुग्णांच्या गावांचे विवरण अद्याप प्राप्त झालेले नाही.




























































