एलआयसीने पॉलिसीची हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन एलआयसीने पॉलिसीधारकांना हप्ते भरण्यास मुदतवाढ द्यावी आणि विलंब शुल्क आकारू नये, ज्येष्ठ नागरिकांना कागदपत्रांच्या पुर्ततेसाठी स्वतंत्र सेल सुरु करुन घरपोच सेवा द्यावी अशी मागणी आमदार अँड आशिष शेलार यांनी एलआयसीच्या चेअरमन एम.आर कुमार यांच्याकडे केली. आमदार आशिष शेलार यांनी एम. आर. कुमार यांची भेट घेऊन मागण्यांचे पत्र दिले.

कोरोना मुळे सर्वांचे आर्थिक गणित कोलमडले असून एलआयसीच्या पॉलिसीचे हप्ते वेळेत न भरल्यास भविष्यात मिळणाऱया फायद्यापासून नागरिक वंचित राहुन त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एलआयसीने सध्याच्या परिस्थितीत काही सवलती देण्याची गरज आहे असे या पत्रात नमूद केले आहे.