कश्मीरमध्ये दहशतवाद्याच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धा; आयोजक, संयोजक, खेळाडूंवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू- कश्मीरच्या शोपीयन जिल्ह्यात हिजबुल मुजाहिदीनच्या पोलीसी कारवाईत मारला गेलेल्या दहशतवाद्याच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धा आयोजित करणाऱया संयोजकांवर जम्मू-कश्मीर पोलिसांनी बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए )  गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी संयोजक म्हणजे  मृत दहशतवाद्याचा भाऊ आणि या स्पर्धेत सहभागी झालेल्या 9 स्थानिक क्रिकेटपटूंवर हा गुन्हा दाखल केला. दहशतवाद्यांचे उदात्तीकरण आणि दहशतवादाला समर्थन हा देशद्रोह ठरतो असे पोलिसांनी सांगितले.

हिझबुलचा सय्यद रूबेन हा दहशतवादी हिंदुस्थानी लष्करासोबत झालेल्या चकमकीत मारला गेला होता.सय्यदच्या भावाने आपल्या दहशतवादी भावाच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. हि माहिती मिळताच जम्मू-कश्मीर पोलिसांनी तात्काळ स्पर्धेच्या ठिकाणी धाव घेत स्पर्धा बंद पाडली आणि संयोजकांसह 10 जणांवर यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. चकमकीत मारला गेलेला अतिरेकी सय्यद रुबेनचा भाऊ तजमुलने या सामन्याचं आयोजन केलं होतं. यासाठी त्याने खास जर्सीही तयार केली होती. आपल्या भावाच्या स्मरणार्थ हा सामना आयोजित करण्यात आल्यामुळे तजमूलने मोठय़ा प्रमाणात स्थानिक क्रिकेटशौकिनांना स्पर्धा पाहायला बोलावले होते. दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून या सामन्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱयांनी दिली.  

भाऊ  चांगला क्रिकेटर होता म्हणून जर्सीकर नाव टाकले – तजमुल

जमुलने भाऊ सय्यद रुबेनचं नाव जर्सीवर प्रिंट करवून घेतलं होतं.  तजमुलने क्रिकेट हा माझ्या भावाचा आवडता खेळ होता. तो खूप चांगला क्रिकेटर  होता, म्हणून त्याचे नाव जर्सीवर टाकल्याचं सांगितलं. ढ़सय्यद रुबेन 2018 मध्ये हिजबुल मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेत दाखल झाला होता. 2019 मध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या एका चकमकीत सय्यद मारला गेला होता.