
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्कीच बिहारमध्ये’ एनडीए’त फुटीचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्यास चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीने (लोजपा)नकार दिल्याचे वृत्त आहे. दरम्यान या फुटीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.
कोरोना महामारी, पूर स्तिथी हाताळण्यात मुख्यमंत्री नितीशकुमार यांना अपयश आले आहे.त्यामुळे नितीशकुमार यांच्यावर जनता नाराज असून लोकप्रियता कमी झाली आहे.याकरून लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्याकडून नितीशकुमार यांच्यावर टीका होत आहे.या टीकेला संयुक्त जनता दलाकडून (जेडीयु) उत्तर दिले जात आहे.नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवावी का नाही? यावर निर्णय घेण्यासाठी पासवान यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवली होती.त्यात नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक नको अशी भूमिका घेतल्याचे लोजपाच्या सूत्रांनी सांगितले.एनडीएतून बाहेर पडायचे का नाही याचा निर्णय पासवान घेतील मात्र बिहारमध्ये नितीशकुमार नको असे पक्षाचे मत असल्याचे समजते.त्यामुळे भाजपलाही झटका बसला आहे.दरम्यान माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचा पक्ष एनडीएमध्ये सामील करून घेतल्यामुळे आघाडीत आणखी पेच वाढला आहे.
कोरोना, पूर परिस्थितीवरून मुख्यमंत्र्यांची नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे. एससी, एसटी समाजातील नागरिकांच्या हत्या होत आहेत. नितीशकुमार यांनी सरकारी नोकरीचे आश्वासन दिले. पण त्यांच्या घोषणा पोकळ आहेत.- चिराग पासवान (अध्यक्ष, लोजपा)
चिराग पासवान सातत्याने चुकीचे विधान करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका आधी बंद केली पाहिजे. आमची युती भाजपबरोबर आहे लोजपा बरोबर नाही.- के. सी. त्यागी (सरचिटणीस, जेडीयु)
























































