
हिंदुस्थान आणि चीनमध्ये लडाखच्या सीमारेषेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रशियाने मोठे विधान केले आहे. हिंदुस्थान- चीनच्या सहमतीशिवाय सीमावादात मध्यस्थी करणार नसल्याचे रशियाने म्हटले आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या हिंदुस्थानी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या मॉस्को भेटीच्या आदी रशियाकडून हे विधान करण्यात आले आहे.
हिंदुस्थानात रशियाचे उपराजदूत रोमन बाबुश्किन म्हणाले की, आम्ही हिंदुस्थान आणि चीन यांना चर्चेसाठी प्रोत्साहित करतो. मात्र रशिया दोन्ही देशांच्या द्विपक्षीय प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करणार नाही. मध्यस्थी करण्यासाठी जोपर्यंत दोन्ही बाजूंनी आम्हाला आमंत्रित केले जात नाही, तोपर्यंत आम्ही हस्तक्षेप करणार नाही. आम्ही दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या कोणत्याही चर्चेचा भाग नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, हिंदुस्थानी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर एससीओच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी रशियाला जात आहेत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांच्या मते, जयशंकर मॉस्कोमध्ये चिनी भागातील वांग यी यांच्याशी द्विपक्षीय बैठक होऊ शकते. जयशंकर मॉस्को येथे आयोजित आठ सदस्यीय शांघाय सहकार संघटनाच्या (एससीओ) परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ज्याचे हिंदुस्थान आणि चीन सदस्य आहेत.




























































