अरुणाचल प्रदेशमधून अपहरण झालेले पाच लोक चीनच्या सीमेवर सापडले, केंद्रीय मंत्री किरेन रिजुजी यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशमधून पाच जणांचे अपहरण झाले होते. हे पाचही लोक चीनच्या सीमेवर सापडल्याची माहिती केंद्रीय मंत्री किरेण रिजुजी यांनी दिली आहे. चीनच्या सैन्यानेच ही माहिती दिल्याचे रिजुजी यांनी सांगितले आहे. अरुणाचल प्रदेशमधून हरवलेले पाच जण चीनच्या सीमेवर सापडल्याचे चीनच्या सेनेने सांगितले आहे. त्यांना लवकरच हिंदुस्थानकडे सोपवले जाईल तशी कार्यवाही सुरू असल्याचे रिजुजी यांनी म्हटले आहे.

गेल्या शनिवारी अरुणाचल प्रदेशच्या एका स्थानिक वृत्तपत्राने बातमी दिली होती की तागिन समुदायाचे पाच लोकांचे अपहरण झाले आहे. पाचही लोक जंगलात शिकारीसाठी गेले होते. या पाच लोकांच्या नातेवाईकांच्या हवाल्याने ही बातमी देण्यात आली होती की चीनच्या सैन्याने त्यांचे अपहरण केले आहे. हे लोक चुकून चीनच्या सीमेत घुसले होते. आता पाचही जणांना हिंदुस्थानकडे सोपवले जाणार आहे, त्याबात दोन्ही सैन्यांतील अधिकार्यां ची चर्चा सुरू आहे.