अमरावतीत कोरोनाचे 91 नवे रुग्ण सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुरुवारी दुपारी आलेल्या विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून कोरोनाचे नवे 91 रुग्ण आढळून आले आहेत. काल रात्रीपर्यंत कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला असून मृतकांची संख्या 163 झाली आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या 7729 झाली आहे.

आज आलेल्या अहवालात अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, मोर्शी, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, वरुड, चांदूर रेल्वे व चांदूर बाजार तालुक्यातील कोरोनाबाधित आहेत. यात सर्वाधिक रुग्ण अचलपूर येथे पाच, तिवसा येथे पाच व वरुड तालुक्यात सर्वाधिक 10 रुग्ण आढळून आले आहेत. इतर रुग्ण अमरावती शहराच्या वेगवेगळ्या भागातील आहेत. अमरावतीत कोरोनाचे 91 नवे रुग्ण सापडले. कोरोनामुळे काल रात्री तिघांचा मृत्यू झाला आहे. यात अचलपूर येथील 60वर्षीय महिला, केडीया नगरातील 80 वर्षीय पुरूष व दस्तूर नगरातील 68 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.