
ऑगसट महिन्यात पडलेला सततचा पाऊस… त्यात वादळी वारा यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा उभा ऊस भुईसफाट झाला. त्यात आता राहिलेल्या पिकात रानडुकरांनी हैदोस घालण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यावर अनेक शेतकऱ्यांनी विविध पर्याय शोधले परंतू डुकरांचा हैदोस कांही कमी होत नव्हता. मात्र आता शेतकऱ्यांना आता एक नामी युक्ती सुचली आहे. शेतकऱ्यांनी शक्कल लढवून ऊसाच्या फडाभोवती साड्या भोवती कुंपन बनवले आहे. त्यामुळे रानडुकरांचा त्रास कमी होत असल्याचे शेतकरी वर्गातुन बोलले जात आहे. परंतू ही खर्चीक बाब असल्याने सर्वच शेतकऱ्यांना परवडणारी नसल्याचेही बोलले जात आहे.
यावर्षी अगदी खरीपाच्या पेरणीपासून तालुक्यात पाऊस पिकाजोगा पडत गेल्याने खरीपाच्या पिकांसह ऊस पिक जोमदार वाढले.ऑगषस्ट महिन्यात तर सतत दहा-बारा दिवस पाऊस झाला. यावेळी पावसासोबत सुसाट्याने वाऱ्याच्या झुळकाही असल्याने जोमदार वाढलेला ऊस भुईसफाट झाला आहे. त्यातच रानडुकरांचा सुळसुळाट वाढल्याने आडवा पडलेल्या ऊसाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असून उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. यासाठी रानडुकरांना ऊसाच्या फडाबाहेर काढण्यासाठी कांहीनी बांधावर तारांचे कुंपन बनवले, काहीनी बांधावरच शेंदूर व बीएससी पावडर शिंपडले. ..परंतू काही केल्या डुकरांचा मज्जाव कमी होत नसल्याने चक्क बायकांच्या साड्या दुकानातून खरेदी करुन त्याचे फडाभोवती लाकडीच्या सहाय्याने कुंपन बनवत असल्याचे पहावयास मिळते.


























































