
प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) बरोबर भागीदारी केली आहे. याचा फायदा आता प्लॅस्टिक वेस्ट मटेरिअल रिकव्हरी मॉडेलच्या माध्यमातून अंधेरी पूर्व, बांद्रा पश्चिम आणि दहिसर या तीन वॉर्डातील 33 हजारांहून अधिक घरांचा समावेश सध्या करण्यात आला आहे. येत्या काही वर्षांत हे मॉडेल आता अधिक घरांतही राबवण्यात येणार आहे. तंत्रज्ञानावर आधारीत असे हे मॉडेल असून यामुळे सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकच्या कचNयाचे वर्गिकरण आणि पुनर्वापर करता येईल. या प्रकल्पासाठी पालिका आणि स्वच्छ पारले अभियानसारख्या नागरिकांच्या संघटनांची मदत घेण्यात येत आहे. या कार्यक्रमामुळे आजमितीस 2500 टन प्लॅस्टिकचा सुखा कचरा गोळा होण्यास मदत झाली. या उपक्रमाला सहकार्य करण्यासाठी 500 हून अधिक सफाई कामगारांची मदत मिळाली.




























































