संभाजीनगर जिल्ह्यात 21,532 रुग्ण कोरोनामुक्त, 5,726 रुग्णांवर उपचार सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यात आज एकूण ३४९ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २८०६१ झाली आहे. आजपर्यंत २१५३२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. एकूण ८०३ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण ५७२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ७५, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ८० आणि ग्रामीण भागात ३३ रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

ग्रामीण भागात १२१ रुग्ण
ग्रामीण भागात आज १२१ रुग्ण आढळून आले. यामध्ये जैन कॉलनी, वैजापूर (१), नवजीवन कॉलनी, वैजापूर (२), रेणुकानगर, वैजापूर (१), संभाजीनगर, वैजापूर (१), हिलालपूर, वैजापूर (१), टिळक रोड, वैजापूर (१), टाकळी सागज, वैजापूर (१), श्रीराम कॉलनी, वैजापूर (२), बिल्डा, फुलंब्री (१), करमाड (४), नेवरगाव, गंगापूर (१), एमआयडीसी क्वार्टर, मोरे चौक (१), फुलेनगर वडगाव (१), बजाजनगर (१), वडगाव कोल्हाटी (१), शिवराई फाटा (२), शिवाजीनगर, जिकठाण (१), हनुमान मंदिर परिसर, वाळूज (१), त्रिमूर्ती कॉलनी, रांजणगाव (१), लक्ष्मी मंदिर परिसर, रांजणगाव (१), गणेशनगर, वाळूज (१), शितल नगर, विटावा (१), स्वामी समर्थनगर, रांजणगाव (१), भगतसिंग नगर, वाळूज (२), भारतनगर, वाळूज (२), शनी मंदिर परिसर, कन्नड (२), शर्मा हॉटेल परिसर, कन्नड (२), पिशोर रोड, कन्नड (१), बालाजी विहार, पैठण (१), भवानीनगर, पैठण (१), साळीवाडा, पैठण (१), यशवंतनगर, पैठण (१), शिव नगर,नारळा, पैठण (२), नाथ विहार पैठण (५), मुद्दलवाडी पैठण (४), रामनगर,पैठण (२), पिंपळवाडी, पैठण (३), नाथ गल्ली, पैठण (१), दुर्गावाडी, पैठण (१), हनुमान मंदिर परिसर, बाबरा (१), शिवाजीनगर, गंगापूर (२), दहेगाव बंगला, गंगापूर (२), लासूर रोड, गंगापूर (१), जाधव गल्ली, गंगापूर (१), सोनार गल्ली, गंगापूर (१), पुरी, गंगापूर (१), उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर (२), कनकसागज (१), मनूर, पोखरी (१), निपाणी, कन्नड (१), तितरखेडा, लोणी (२), साफियाबाद वाडी, शिऊर (२), सिडको वाळूज महानगर (२), एएस क्लब जवळ (१), अन्वा, सिल्लोड (१), पिशोर, कन्नड (२), वडोद बाजार, फुलंब्री (१), राहलपट्टी तांडा (१), आडगाव, कन्नड (१), संभाजीनगर (१२), फुलंब्री (१), गंगापूर (३), कन्नड (५), रत्नपूर (२), पैठण (११)

मनपा  क्षेत्रात ७३ रुग्ण
मनपा क्षेत्रात आज ७३ रुग्ण आढळून आले. यामध्ये गारखेडा (२), जय विश्वभारती कॉलनी (१), एन नऊ सिडको (१), वसंतनगर, जाधववाडी (२), दर्गा रोड (१), अन्य (४), विष्णूनगर (१), खिंवसरा पार्क (१), न्यू शांतीनिकेतन कॉलनी (१), अरिहंतनगर (१), बालाजीनगर (१), ऑरेंज सिटी (१), चुना भट्टी (१), एन सहा सिडको (३), रेल्वे स्टेशन परिसर (१), नूतन कॉलनी (१), चेतक घोड्याजवळ (१), सातारा पोलिस स्टेशन परिसर (१), सिल्क मिल कॉलनी (२), छावणी परिसर (१), नारळीबाग (१), काका चौक (६), गजानननगर (१), पडेगाव (२), आलोकनगर (१), राजा बाजार (१), मयूर पार्क (२), गरवारे स्टेडियम परिसर (१), कॅनॉट प्लेस (१), एमजीएम परिसर (१), शहानूर वाडी (३), म्हाडा कॉलनी (१), शिवकृपा अपार्टमेंट, गारखेडा परिसर (१), एन बारा हडको (२), सुराणा नगर (२), भावसिंगपुरा, पंडित कॉलनी (२), लक्ष्मी कॉलनी (१), चाऊस कॉलनी (१), सुदर्शननगर, हडको (१), मिलिट्री हॉस्पीटल (१), हर्सुल (१), रमाबाई नगर, चिकलठाणा (१), मुजफ्फरनगर (१), सिडको (१), तारांगण, पडेगाव (१), श्रीकृष्णनगर (१), बॉयज हॉस्टेल, घाटी परिसर (१), मार्ड हॉस्टेल (१), मुकुंदवाडी (२), जवाहरनगर (१), पैठण रोड (१), हडको (१)

सिटी एंट्री पॉइंट (७५)
ज्योती नगर (२), रामनगर (१), उत्तरानगरी (१), एन सहा सिडको (६), मुकुंदवाडी (३),  वाळूज (१), बजाजनगर (५), वाळूज पंढरपूर (१), सातारा परिसर (३), वैजापूर (१), आर्मी कॅम्प (१), रांजणगाव (१), तिसगाव (१), वडगाव (५) साफल्य नगर, हर्सूल (१) पिसादेवी (१), अंधारी, सिल्लोड (१), बेगमपुरा (१), एन -नऊ, पवन नगर (७), एन-११, नवजीवन कॉलनी (२), पहाडसिंगपुरा (१), भगतसिंग नगर (२), सुरेवाडी (१), समृद्धी महामार्ग, लेबर (१), एन – सात, सिडको (१), एन-दोन, साई नगर (१), इएसआयसी हॉस्पीटल क्वार्टरस (३), सावंगी (२), मयूर पार्क (१), पानवडोद, सिल्लोड (१), कांचनवाडी (२), इटखेडा (२), आसेगाव, गंगापूर (१), चौधरी कॉलनी, चिकलठाणा (१), रत्नपूर (१), जय भवानीनगर (२), चिकलठाणा (१), सुंदरवाडी (१), म्हाडा कॉलनी (१), पडेगाव (२), भावसिंगपुरा (१), सिडको महानगर (१)

अकरा कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत बेगमपु-यातील ५४ वर्षीय पुरूष, गणेश चौकातील ७५ वर्षीय पुरूष, गंगापुरातील ६५ वर्षीय पुरूष, सिडको वाळूज महानगरातील ५४ वर्षीय पुरूष, छावणी परिसरातील ६२ वर्षीय पुरूष आणि फुलंब्रीतील ६५ वर्षीय महिला व खासगी रुग्णालयात साळीवाडा, पैठण येथील ६७ वर्षीय महिला, सिल्क मिल कॉलनीतील ७७, पोलिस स्टेशन रोड, वैजापूर येथील ६४ वर्षीय महिला, कोतवालपुऱ्यातील ७२ वर्षीय पुरूष आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात काका चौकातील ७२ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.