
स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी बार्सिलोना क्लबसाठी शनिवारी झालेल्या फ्रेंडली सामन्यात 45 मिनिटे खेळला. त्यामुळे बार्सिलोना क्लबचे नवनिर्वाचित कोच रोनाल्ड कोमॅन यांनी आनंद व्यक्त केला. बार्सिलोनाने जिम्नॅस्टिक तारागोनाविरुद्धची ही लढत 3-1 अशा फरकाने जिंकली. रोनाल्ड कोमॅन यांनी दोन सत्रांमध्ये दोन वेगवेगळे संघ मैदानात उतरवले. यावेळी लियोनेल मेस्सीच्या हाताला बॅण्ड लावले होते. याचा अर्थ आगामी मोसमात बार्सिलोनाचे नेतृत्व त्याच्याच खांद्यावर असेल हे निश्चित झाले आहे.
मात्र रोनाल्ड कोमॅन आगामी मोसमात लियोनेल मेस्सी, अॅण्टोईन ग्रिझमन व उसमान डेम्बेले या तिन्ही आक्रमक फळीत खेळणाऱया फुटबॉलपटूंना एकत्र खेळवणार की नाही याबाबत साशंकता आहे, पण गेल्या काही दिवसांमध्ये बार्सिलोना क्लब व्यवस्थापन व लियोनेल मेस्सी यांच्यामध्ये झालेल्या वादविवादानंतर अखेर अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू मैदानात उतरल्यामुळे संघातील इतर खेळाडूंचा उत्साह नक्कीच वाढला असेल यात शंका नाही.



























































