
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्य़ा वाराणसीतील कनिष्ठ अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे. सरकारी नियमभंग आणि पंतप्रधानांवर अभद्र टिपणी, असे आरोप या अभियंत्यावर ठेवण्यात आले आहेत.
वाराणसी येथील अभियंता प्रवीण कुमार याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर विविध राजकीय नेत्यांसोबतचे आपले फोटो पोस्ट केले. एवढेच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही आक्षेपार्ह टीका केली. प्रवीण कुमार हा 26 ऑगस्टपासून कोणतीही पूर्वसूचना वा अर्ज न देता सुट्टीवर गेला आहे. वरिष्ठांनी प्रवीण कुमारच्या फेसबुक पोस्टची दखल घेऊन त्याला सरकारी सेवेतून निलंबित केले आहे.


























































