बेशिस्त वाहनचालकांवर करडी नजर, अत्याधुनिक झुम कॅमेरे रत्नागिरी शहरात बसवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी वाहतूक पोलीसांनी मारुती मंदिर येथे दोन अत्याधुनिक कॅमेरे बसवले आहेत़. हे दोन्ही कॅमेरे 360 डिग्रीमध्ये फिरुन वाहनचालकांवर लक्ष ठेवणार आहेत़. या नव्या अत्याधुनिक प्रणालीचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. वाहतूकीचे नियम तोडणार्‍या वाहनचालकांवर आता पोलीसांची करडी नजर राहणार आहे़.

शहरामध्ये अनेकवेळा वाहनचालक वाहतूकीचे नियम तोडतात़. नो पार्किंगमध्ये वाहन पार्किंग करणे, सीटबेल्ट न लावता वाहन चालवणे, धूमस्टाईल वाहन चालवणे अशा प्रकारचे गैरप्रकार घडत असतात़. चेकनाक्यावरील पोलीसांना बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण ठेवताना अनेकवेळा मर्यादा येतात़. अशावेळी हे अत्याधुनिक कॅमेरे पोलीसांना मदत करणार आहेत़. 360 डिग्रीपर्यंत हा कॅमेरा फिरत असल्यामुळे माळनाक्यापर्यंत, नाचणेरोड आरोग्यमंदिरपर्यंतच्या वाहनचालकांवर हा कॅमेरा लक्ष ठेवणार आहे. झूम कॅमेरामधून बेशिस्त वाहनचालकांच्या गाडीचा नंबर मिळणार असून तो सॉफटवेअरमध्ये अपलोड करताच वाहनचालकाच्या मोबाईलवर त्याला ई चलन मिळणार आहे़. उद्‌घाटनप्रसंगी पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी स्वतः काम कसे चालते याची पाहणी केली़. यावेळी वाहतूक पोलीस निरिक्षक अनिल विभुते उपस्थित होते़. शहरात आणखी 12 ठिकाणी अत्याधुनिक कॅमेरे बसवले जाणार आहेत.