विधी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अनुदानित वर्गात प्रवेश द्यावा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधी (लॉ) अभ्यासक्रमाच्या विद्याथ्र्यांना विनाअनुदानित वर्गातून अनुदानित वर्गात प्रवेश द्यावा अशी मागणी युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.

विधी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलमार्पâत केली जाते. अनेक विद्यार्थ्यांना अनुदानित वर्गात प्रवेश दिला जातो. त्या विद्याथ्र्यांना पुढील वर्षात अनुदानित किंवा विनाअनुदानित वर्गात प्रवेश मिळतो. मात्र अशा विद्याथ्र्यांना विनाअनुदानित वर्गातच प्रवेश घेण्याची जाचक अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे द्वितीय वर्षापासून जागा असूनही गुणवंत विद्याथ्र्यांना अनुदानित वर्गात प्रवेश मिळत नाही. त्यामुळे ही जाचक अट रद्द करावी जेणेकरून गरीब विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक भुर्दंड पडणार नाही, असे युवा सेनेने उच्चशिक्षण मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे.

युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर, महादेव जगताप, शशिकांत झोरे, सुप्रिया करंडे, शितल शेठ-देवरुखकर, धनराज कोहचाडे, युवा सेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी हे निवेदन दिले अशी माहिती युवा सेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.