प्रबोधनकार ठाकरे यांना उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रबोधनकारांच्या कार्याचे स्मरण करून अभिवादन केले.

प्रबोधनकार ठाकरे यांची आज गुरुवार 17 सप्टेंबरला जयंती आहे. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रबोधनकारांच्या कार्याचे स्मरण केले. प्रबोधनकार ठाकरे हे सुधारणावादी विचारांचे कृतीशील नेते होते. समाजातील वाईट रुढी, परंपरा, जातीव्यवस्था, अस्पृश्यतेवर त्यांनी प्रहार केला. बालविवाह, केशवपन, हुंडाप्रथेसारख्या रुढींविरुद्ध त्यांनी प्रखर लढा दिला. ते खऱ्य़ा अर्थानं ‘प्रबोधन’कार होते. लेखक, पत्रकार, इतिहास संशोधक म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील आघाडीचं नेतृत्वं म्हणून त्यांचं योगदान खूप मोठे आहे. त्यासाठी ते महाराष्ट्राला नेहमीच आदरणीय राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले.