मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठवाडा ही संतांची भूमी आहे. अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानातून व त्यांनी सहन केलेल्या अत्याचारातून ही भूमी रझाकारांच्या जोखडातून मुक्त झाली. मराठवाड्यासाठी आजचा दिवस स्वातंत्र्यदिन आहे. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे सांगून त्यांनी संभाजीनगरच्या विकासासाठी संभाजीनगर विकास प्राधिकरण स्थापन करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संभाजीनगर येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण सिद्धार्थ उद्यानातील स्मृती स्तंभाजवळ पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हीडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून मुंबईतून सहभागी झाले होते.

मराठवाडा विकासाच्या दिशेने चालला आहे. यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मराठवाडा समृद्ध होणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.