
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाने जयपूरमधून दुबईला जाणाऱया प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना दुबईमध्ये 15 दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे.
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाने काही दिवसांपूर्वी दुबईला गेलेल्या प्रवाशाला कोरोनाची लागण झाली आहे. या प्रवाशांच्या उपचाराचा आणि क्वारंटाइन ठेवण्याचा खर्चही एअर इंडियाला करावा लागणार आहे. दरम्यान, हिंदुस्थानातून उड्डाण करणाऱया विमानांना 2 ऑक्टोबरपर्यंत दुबईमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे.

























































