
दिल्ली दंगली प्रकरणी अटकेत असलेला उमर खालिद याची सुटका करावी, या मागणीसाठी आता शिक्षणतज्ञ, कलाकार आणि लेखक मंडळीचा एक गट पुढे सरसाकला आहे. या मागणीसाठी तब्बल 200 जणांनी एक संयुक्तिक पत्र काढत ही मागणी केली आहे. यात नोआम चौमस्की, मीरा नायर, अभिनेत्री रत्ना पाठक शहा, अमितक घोष, सलमान रश्दी, अरुंधती रॉय आणि पत्रकार पी.साईनाथ यांचा समावेश आहे.
दिल्ली येथे फेब्रुकारीमध्ये झालेल्या दंगली प्रकरणी दिल्ली पोलिसांनी उमर खालिद याला अटक केली होती. बेकायदा कृत्यकिरोधी कायद्याअंतर्गत पोलिसांनी ही कारकाई केली आहे. आज न्यायालयाने खालिदला 22 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनाकली. दरम्यान, खालिद याच्या सुटकेसाठी आता एक कर्ग पुढे सरसाकला असून त्यात लेखक, कलाकंत आणि शिक्षणतज्ञांचा समाकेश आहे. सरकारला लिहलेल्या या पत्रात उमरच्या सुटकेची मागणी करण्यात आली असून पोलिसांनी केलेली कारकाई ही चुकीची असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
























































