मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज गंगापूर धरणावरील पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने नाशिकच्या गंगापूर धरण येथे 14.48 हेक्टर जागेत ग्रेपपार्प रिसॉर्ट हे पर्यटक संपुल उभारले आहे. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून रविवारी, 27 सप्टेंबर रोजी या संपुलाचे ई-उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

तिर्थक्षेत्र असलेल्या नाशिक व परिसराला निसर्गरम्य वातावरणाचे वरदान लाभले आहे. त्याचबरोबर हा जिल्हा द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असल्याने वाईन पॅपिटल अशी ओळख नाशिकला मिळाली आहे. यामुळे देश-विदेशातील पर्यटक शहराला भेट देत असतात. त्यांच्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने गंगापूर धरण येथे 14.48 हेक्टर जागेत ग्रेपपार्प रिसॉर्ट साकारले आहे. येथे 28 पर्यटक कक्ष, 4 ट्विन व्हिला, उपहारगृह, जलतरण तलाव, सभागृह या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच या परिसरातील बोट क्लब येथे 11 बोट प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहेत. या विकासकामांसाठी एपूण 72 कोटी खर्च करण्यात आला आहे.

जागतिक पर्यटन दिनी रविवारी, 27 सप्टेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या संपुलाचा ई-उद्घाटन सोहळा होणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,a महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पृषी मंत्री दादा भुसे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांची प्रमुख उपस्थिती राहील, अशी माहिती प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांनी दिली आहे.