
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हाथरस दौऱ्यावर टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. स्मृती इराणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बांगड्या भेट म्हणून कधी पाठवणार, असा सवाल करत काँग्रेसचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर निशाणा साधलाय. या प्रकरणावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका होत असताना भाजपकडून त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. स्मृती इराणीजी, तुम्ही केवळ इतकंच सांगा, आदित्यनाथ यांना बांगड्या भेट करण्यासाठी कधी जात आहात?’ असं ट्विट करत सुरजेवाला यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.



























































