एटीएम केंद्रातील 16 हजाराच्या 8 बॅटऱ्यांची चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैशांसाठी चोरटे कोणत्याही वस्तूंवर डल्ला मारत आहेत. पुणे शहरातील शिवाजी रस्त्यावरील एका एटीएम सेंटरमधील केंद्रातून चोरट्यांनी 16 हजार रुपये किंमतीच्या 8 बॅटरी चोरल्या आहेत.

एटीएम केंद्रांची सुरक्षा कर्मचारी संतोष माने यांनी खडक पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली आहे. शिवाजी रस्त्यावरील शाहू चौकात एचडीएफसी बँकेचे एटीएम केंद्र आहे. 30 सप्टेंबरला मध्यरात्री एटीएम केंद्रात शिरलेल्या चोरट्यांनी 8 बॅटरी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एटीएम केंद्रापासून काही अंतरावर फडगेट पोलीस चौकी आहे. असे असतानाही चोरट्यांनी बॅटऱ्या चोरुन नेल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक रतिकांत कोळी अधिक तपास करत आहेत.