Bihar Election – उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पोलिसांकडून उमेदवारांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहार निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस आहे. काही उमेदवारांनी अर्ज भरताच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सर्व अटक आरोपींवर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल होते. पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली आहे.

बिहारमध्ये राजकारण आणि गुन्हेगारीगारांचा संबंध जुना आहे. त्याचीच प्रचिती आज बिहारमध्ये दिसून आली.  बिहारच्या अगिऑव जागेवरून मनोज मंजिल, शाहपूर विधानसभा मतदारसंघातून बुटेश्वर यादव यांनी नुकतंच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पण निवडणूक कार्यालयाच्या बाहेर पोलीस त्यांची वाट पाहत होते. बाहेर येताच पोलिसांनी दोन्ही उमेदवारांना बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही उमेदवारांविरोधात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल होते. आज पोलिसांनी वॉरंट जारी करत दोघांना अटक केली आहे.