
पुणे शहरात रिलायन्स फ्रेश स्टोअरचे शटर उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील 15 हजारांची रोकड चोरुन नेली. ही घटना दोन दिवसांपुर्वी बोपोडीत घडली. याप्रकरणी मेनका खैरनार (वय 40, रा. तळेगाव-दाभाडे ) यांनी खडकी पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपोडीत रिलायन्स कंपनीचे भाज्या विक्रीचे स्टोअर आहे. संबंधित स्टोअरच्या मेनका व्यवस्थापिका आहेत. दोन दिवसांपूर्वी स्टोअर बंद असताना चोरट्यांनी शटर उचकटून गल्ल्यातील 15 हजारांची रोकड चोरुन नेली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी तपास करीत आहेत.

































































