विशेष मुलांकरिता ‘मार्गिका’चा टॅलेंट शो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मार्गिका’ या अमेरिकास्थित व हिंदुस्थानातही सक्रिय असलेल्या संस्थेने येत्या शनिवारी 10 तारखेला ‘जागतिक मानसिक आरोग्य दिना’च्या निमित्ताने ‘मेराकी’ या ई-टॅलेंट शोचे आयोजन केले आहे. विशेष मुलांच्या टॅलेंटकरिता मंच उपलब्ध करून देऊन कोरोनाच्या या अस्वस्थ करणाऱ्या काळात त्यांच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचा हेतू त्यामागे असल्याचे ‘मार्गिका’च्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी नीना राव यांनी सांगितले.

मार्गिकाच्या या उपक्रमाला देशातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या कार्यक्रमाच्या शनिवारी पार पडणाऱ्या ई-उद्घाटन सोहळ्यात अमेरिकेतील ख्यातनाम मनोविकारतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. www.margika.org या संकेतस्थळाकर तसेच संस्थेच्या फेसबुक पेजवर याचे तपशील मिळू शकतील. मार्गिकाने सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत तेलंगणा राज्यात 800 प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविला असून त्याद्वारे 8 हजार कुटुंबांना समुपदेशन व आधार दिला जाणार आहे. अशाच तऱ्हेचा उपक्रम महाराष्ट्रातही राबविण्याचा राव यांचा मानस आहे.