सुन्नी धर्मगुरुची हत्या; इम्रान खान म्हणतात शिया-सुन्नी हिंसाचार घडवण्याचा हिंदुस्तानचा डाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानच्या कराची शहरात काल शनिवारी अदिल खान या सुन्नी धर्मगुरुची हत्त्या करण्यात आली. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची ही हत्त्या केली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मौलाना अदिल खान यांच्या हत्येचा निषेध केला आणि शिया आणि सुन्नींमध्ये सांप्रदायिक हिंसाचार घडवून आणण्याचा हिंदुस्तानचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. काही दशकापूर्वी कराचीत सुन्नी मुस्लिमांना शिक्षण देण्यासाठी जामीया फारुकीया नावाचा मदरसा सुरु करणाऱया दिवगंत मौलाना सलीममुल्लाह खान यांचा मुलगा असलेल्या अदिलखान यांनी  सुपूत्र होते. काही दशकांपूर्वी अदिल खान यांच्या वडिलांनी जामिया फारुकिया नावाचा मदरसा सुरु केला होता. शनिवारी संध्याकाळी शाह फैसल काॅलनीमध्ये अदिल खान यांच्या गाडीवर हल्ला झाला. गोळीबारात अदिल खान आणि त्यांच्या ड्रायव्हरचा दोघांचा मृत्यू झाला.