बोरिवलीत प्रदूषण रोखण्यासाठी सायकल ट्रॅक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निरोगी आरोग्यासाठी उद्यानामध्ये आता सायकल ट्रेनिंग ट्रॅक बनवण्यात येणार आहेत. बोरिवलीतील आयसी कॉलनीतील झेन गार्डन येथे पहिला सायकल स्टॅण्ड तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘सायकल चलाक, सिटी बचाव’ ही मोहीम आज राबवण्यात आली.

रविवारी सायकल मेयर ऑफ मुंबई फिरोझा सुरेश व स्मार्ट कम्युट फाऊंडेशनतर्फे आज आयसी कॉलनी येथील झेन गार्डन परिसरात ‘सायकल चलाव, सिटी बचाव’ ही सायकलिंग मोहीम राबवण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक, मुंबै बँकेचे संचालक अभिषेक घोसाळकर, हॅन्सल परेरा, फिरोझा सुरेश, मनोज नायर व राकेश देसाईसहित अनेक सायकलस्वार उपस्थित होते. दरम्यान, शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी मुंबई पालिकेत शहरातील प्रदूषण रोखण्यासाठी रेल्वे-मेट्रो स्थानक, शाळा, महाविद्यालय, मॉल, थिएटर, पालिका प्रभाग कार्यालय तसेच इतर प्रमुख कार्यालयात सायकल स्टॅण्ड बनवण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

इथे बनवणार सायकल स्टॅण्ड
दहिसर प्रभाग 1 मधील झेन गार्डन आणि इतर उद्यानाजवळ आता सायकल ट्रक व स्टॅण्ड बनवण्यात येणार आहे तसेच प्रमिलानगरजवळील दहिसर नदी येथील पुलाच्या समांतर रस्त्यावर सायकल ट्रॅक बनवण्यात येणार आहे. बोरिवलीकरांसाठी ही आगळीवेगळी संकल्पना अभिषेक घोसाळकर प्रत्यक्षात आणत आहेत.