
मुलुंडमधील अॅपेक्स कोरोना रुग्णालयाचा जनरेटर पेटल्यामुळे रुग्णालयाला रात्री 8 च्या सुमाराला आग लागली. मात्र, कर्मचारी आणि अग्निशमन दलाने बचावकार्य करत रुग्णालयातील 40 रुग्णांना बाजूच्या रुग्णालयात सुरक्षितपणे हलवले. दरम्यान, यात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.
मुंबईत सोमवारी सकाळी खंडित झालेला वीजपुरवठा अडीच तासाने सुरुळीत झाला. मात्र, मुंबईतील काही ठिकाणी सोमवारी रात्रीपर्यंत काही ठिकाणी विजेचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. अशा ठिकाणी जेनरेटरचा वापर करण्यात येत होता. मुलुंडच्या पश्चिमेतील वीणानगरमध्ये असलेल्या अॅपेक्स कोरोना रुग्णालयातही जनरेटर अधिक वेळ सुरू राहिल्याने तो 8 च्या सुमाराला पेटला. मात्र, कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, अॅपेक्समधील रुग्णांना पहर्टिस, मिठानगर, मुलुंड जम्बो सेंटर आणि आस्था रुग्णालयात सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे.


























































