हत्तीवर बसून योगा करताना योगगुरू बाबा रामदेव कोसळले, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात आपल्या योग विद्येसाठी प्रसिद्ध असणाऱ्या बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात ते हत्तीवर बसून योगा करताना दिसत आहे. मात्र अचानक त्यांचा तोल जातो आणि ते खाली कोसळतात. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मथुरा येथील रमणरेती आश्रमात योगगुरू बाबा रामदेव हत्तीवर बसून योगा करत होते. याच दरम्यान हत्तीने हालचाल केल्याने बाबा रामदेव यांचे संतुलन बिघडले आणि ते खाली पडले. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याआधी देखील बाबा रामदेव यांचा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मंचावरून पडल्याचा तसेच काही महिन्यांपूर्वी त्यांचा सायकल वरून पडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

दरम्यान, हत्तीवरून पडल्याचा व्हिडीओ 12 ऑक्टोबरचा असल्याचे वृत्त आहे. मथुरा येथील गुरु शरणानंद यांच्या आश्रमात संत-महंत यांना ते योगा शिकवत होते. हत्तीवर बसून एक आसन करत असताना हत्ती हालचाल करतो आणि बाबा रामदेव खाली पडतात. मात्र लागलीच ते उठून चालताना दिसत असल्याने त्यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नसल्याचे दिसते.