
राहाता तालुक्यातील लोणी येथील सराफी पेढीवर दरोडा टाकणाऱया अट्टल गुन्हेगारांची टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे. त्यांच्या ताब्यातून 21 किलो 700 ग्रॅम चांदीसह साडेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नवनाथ साहेबराव गोडे (वय 32, रा. सावळीविहीर, ता. राहाता), अतुल चंद्रकांत आमले (वय 24, रा. कर्वेनगर, घोसाळे, जि. पुणे), सागर गोरख मांजरे (वय 23, रा. मातापूर, ता. श्रीरामपूर, हल्ली रा. शिवाजीनगर, नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
8 ऑक्टोबर रोजी लोणी गावातील संतोष मधुकर कुलथे हे आपली सराफी पेढी बंद दुकानातील सर्व सोने-चांदीचे दागीने दोन पिशव्यांमध्ये भरून घरी जाण्याच्या तयारीत होते. यावेळी दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी शस्त्र्ााचा धाक दाखवून कारमध्ये ठेवलेल्या सोने-चांदीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी लोणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी घटनास्थळी धाव घेऊन शिर्डीचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे व लोणीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांची पथके तयार करून तपासाच्या सूचना दिल्या होत्या.
तपासादरम्यान आरोपी पुणे जिह्यातील शिरूर येथे लपल्याची माहिती माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने शिरूरमधून आरोपींना ताब्यात घेतले.


























































