
लातूर जिल्ह्यातील अनेक मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. हवामान खात्याने बुधवार आणि गुरुवारीही अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क आहे. याअतिवृष्टीने जिल्ह्यातील सोयाबीनह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासामध्ये लातूर तालूक्यातील लातूर मंडळात 74.8 मि.मी., बाभळगाव मंडळामध्ये 77.3 मि.मी., कासारखेडा मंडळामध्ये 80 मि.मी., चिंचोली मंडळामध्ये 74.3 मि.मी., कन्हेरी मंडळामध्ये 73.5 मि.मी. पाऊस झाला आहे. लातूर तालूक्यात 56.4 मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे. औसा तालूक्यातील औसा मंडळामध्ये 84.3 मि.मी., लामजना मंडळामध्ये 105 मि.मी., भादा मंडळामध्ये 70.5 मि.मी., बेलकुंड मंडळामध्ये 81.8 मि.मी., किनी मंडळामध्ये 78.5 मि.मी., किल्लारी मंडळामध्ये 107.8 मि.मी. तर औसा तालूक्यात 81.6 मि.मी.सरासरी पाऊस झाला आहे.
निलंगा तालूक्यातील निलंगा मंडळामध्ये 125 मि.मी., पानचिंचोली मंडळामध्ये 75.3 मि.मी., निटूर मंडळामध्ये 85.5 मि.मी., औराद शहाजानी मंडळामध्ये 83 मि.मी., कासारबालकुंदा मंडळामध्ये 145.3 मि.मी., अंबुलगा मंडळामध्ये 124.8 मि.मी., मदनसूरी मंडळामध्ये 107.8 मि.मी., कासारशिरसी मंडळामध्ये 124.5 मि.मी., हालगरा मंडळामध्ये 114.3 मि.मी., भुतमुगळी मंडळामध्ये 122.3 मि.मी. पाऊस झाला आहे. निलंगा तालूक्यात 110.8 मि.मी.सरासरी पाऊस झाला आहे.
उदगीर तालूक्यातील नागलगाव मंडळामध्ये 84.5 मि.मी., नळगीर मंडळामध्ये 73 मि.मी., मोघा मंडळामध्ये 86.3 मि.मी. पाऊस झाला आहे. उदगीर तालूक्यात 64.8 मि.मी. सरासरी पाऊस झाला आहे. चाकूर तालूक्यातील चाकूर मंडळामध्ये 66 मि.मी. नळेगाव मंडळामध्ये 77 मि.मी. शेळगाव मंडळामध्ये 83.3 मि.मी. आष्टा मंडळामध्ये 77.8 मि.मी. पाऊस झाला आहे. चाकूर तालूक्यात 65.3 मि.मी.सरासरी पाऊस झाला आहे. रेणापूर तालूक्यात 34.9 मि.मी.सरासरी पाऊस झाला आहे. देवणी तालूक्यातील देवणी मंडळामध्ये 81 मि.मी., बोरोळ मंडळामध्ये 88.5 मि.मी., वलांडी मंडळामध्ये 101.8 मि.मी.पाऊस झाला आहे. देवणी तालूक्यात 90.4 मि.मी.सरासरी पाऊस झाला आहे.
शिरुर अनंतपाळ तालूक्यातील शिरुरअनंतपाळ मंडळामध्ये 66 मि.मी.,साकोळ मंडळामध्ये 93.8 मि.मी., हिसामाबाद मंडळामध्ये 78.3 मि.मी पाऊस झाला आहे. शिरुर अनंतपाळ तालूक्यात 79.4 मि.मी.सरासरी पाऊस झाला आहे. जळकोट तालूक्यात 25.4 मि.मी.सरासरी पाऊस झाला आहे. लातूर जिल्ह्यातील एकूण सरासरी पाऊस 68 मि.मी. झाला आहे.

































































