
परतीच्या पावसाने आज अर्ध्या महाराष्ट्राला जोरदार तडाखा दिला. सोलापूर जिल्हय़ातील पंढरपूर आणि अक्कलकोट तालुक्यात या पावसाने हाहाकार उडवला तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगलीतही तो जोरदार कोसळला. या पावसाच्या तडाख्यातून लातूर, धाराशीवही बचावले नाही. कोकणात तर हा पाऊस गेले आठ दिवस धो-धो कोसळतो आहे. सिंधुदुर्ग जिह्यात बहुतेक ठिकाणी कापणी केलेले भात अक्षरश: पाण्यावर तरंगत असून दाणा पुजण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्टय़ात भूकंपाचे धक्के
आज रात्री पावणेनऊच्या सुमारास सह्याद्री पट्टय़ातील कलंबिस्त पंचक्रोशी, आंबोली परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. माडखोल भागातही भूकंप झाला. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दुजोरा दिला आहे. मात्र भूकंपाची तीव्रता नेमकी किती होती याबाबत कळू शकले नाही





























































