1930 च्या महामंदीप्रमाणेच जगभर भीषण आर्थिक मंदी, विकसनशील, गरीब देशांचे पुरते वाट्टोळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1930 च्या दशकातील महामंदीनंतर संपूर्ण जगभरात पुन्हा तितकीच भीषण आर्थिक मंदी आली आहे. कोरोनाचा फैलाव गरीब तसेच विकसनशील देशांसाठी अत्यंत विध्वंसकारी ठरला आहे, अशी चिंता जागतिक बँकेने व्यक्त केली आहे. या देशांच्या विकासासाठी जागतिक बँक व्यापक कार्यक्रमाची आखणी करीत आहे. या माध्यमातून गरीब देशांना मदतीचा हात दिला जाईल, असे बँकेचे अध्यक्ष डेविड मालपास यांनी जाहीर केले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेची वार्षिक बैठक बुधवारी पार पडली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गरीब आणि विकसनशील देशांतील लोकांचा रोजगार बुडाला आहे. नोकऱया गेल्याने त्यांचे उत्पन्न पूर्णतŠ ठप्प झाले आहे. याच अनुषंगाने गरीब देशांच्या सामाजिक सुरक्षेसाठी अतिरिक्त आधार देण्यावर जागतिक बँक काम करीत आहे. हे काम याच आर्थिक वर्षात पूर्ण होईल, असा विश्वास आहे. याबरोबरच पृषी क्षेत्रातील आव्हानांचाही अभ्यास करीत आहोत, असे मालपास यांनी सांगितले. सध्याच्या संकटाच्या काळात विकसित अर्थव्यवस्था गरीब व विकसनशील देशांना आधार देण्यास सक्षम आहेत. विशेषकरून, वित्तीय बाजाराला आणि लोकांना रोजगार देण्याचे काम केले जात आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

मुलांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होणार
शाळा पुन्हा उघडणे ही सर्वात मोठी समस्या असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. अजूनही विकसनशील देशांतील अब्जावधी मुले शाळेबाहेर आहेत. यात मुलांचा अभ्यासक्रम खूप मागे राहील व त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होईल. विशेषतŠ मुलींना मोठा फटका बसेल.

काही देशांच्या वाटय़ाला दीर्घकाळ खराब परिस्थिती
काही देशांना दिर्घकाळ खराब, भीषण परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. पर्यटन क्षेत्राचा विकास वेगाने पूर्वपदावर येईल, अशी पुठलीही आशा आम्हाला सध्यातरी दिसत नाही. अर्थव्यवस्थांना लवचिक भूमिका घ्यावी लागेल, जेणेकरून नोकरी मिळवण्यासाठी सक्षम बनतील, असेही मालपास यांनी यावेळी सुचवले.