मानवाच्या तोंडातील अक्कल दाढ लुप्त होण्याच्या मार्गावर; ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माणसाचे तोंड लहान होत असल्याने अक्कल दाढेला जागा उरत नाही. त्यामुळे माणसामधील अक्कल दाढ लुप्त होण्याच्या मार्गावर असून खाण्यापिण्याच्या सवयीतील बदलांमुळे त्या नामशेषही होत असल्याचा धक्कादायक खुलासा ऑस्ट्रलियामधील वैज्ञाानिकांनी एका संशोधनाद्वारे केला आहे. कच्च्या वस्तू चावण्याच्या प्रक्रियाही कमी झाल्या आहेत. आता मानवी हातातून एक अतिरिक्त धमणी सापडल्याचा अजब दावाही त्यांनी केला आहे. गेल्या 250 वर्षात हे विचित्र बदल पाहिले गेल्याचे सांगताना वैज्ञाानिक या प्रक्रियेस आधुनिक मानवामधील मायक्रोइवोल्युशनची संज्ञा देत आहेत.

विसाव्या शतकात मानवांनी इतका विकास केला आहे की, कोणत्याही मूलभूत शारीरिक विकासाची शक्यता नगण्य आहे. तथापि अलिकडील संशोधनाच्या निष्कर्षामुळे ही धारणा बदलली आहे. जर्नल ऑफ एनाटॉमीमध्ये प्रसिध्द झालेल्या संशोधनानूसार माणसाच्या हातामध्ये एक अतिरिक्त धमनी सापडली आहे. प्रोफेसर मेसी हेनबर्ग या संशोधकांच्या मते, ही एक विशेष प्रकारची धमनी आहे. जेव्हा मूल गर्भाशयात सुरूवातीच्या अवस्थेत असते त्यावेळेला त्याच्या विकसित होणाऱ्या हातामध्ये रक्ताचा प्रसार होतो. परंतु जसजसे रेडियल आणि अलनल विकसित होतात. त्यावेळेला मध्यम धमनी अदृश्य होते. नोव्हेंबर 1869 मध्ये वैज्ञानिक चार्ल्स डार्विन यांर्नीं ऑन द ओरिजिन ऑफ इस्परिस या पुस्तकात जगाला उत्क्रांतीचा सिध्दांत दिला. यानुसार सर्व प्राणी वेळ आणि परिस्थितीनूसार बदलत आहेत. जे बदलू शकले नाहीत ते नामशेष झाले.

माणसांमध्ये कच्च्या गोष्टी खाण्याच्या सवयी गेल्या
आता माणसांची कच्च्या वस्तू खाण्याची सवय सुटली आहे. त्याला चावून खाण्याची आवश्यकता वाटत नाही. सुरूवातीला जेव्हा असे बदल पाहिले गेले. तेव्हा वैज्ञानिकांनी 20 व्या शतकात जन्मलेलया लोकांच्या शरीरांची तपासणी करण्यास सुरूवात केली. त्यांना आढळले की काही लोकांच्या हातात व पायामध्ये अतिरिक्त हाडे आहेत. काही लोकांच्या पायातही हाडेही आढळली. गेल्या 250 वर्षात माणसाच्या शरीर रचनेत वेगाने विचित्र बदल घडत असल्याचे दिसून आले.

आता फायदे आणि तोटे सांगणे कठीण
आश्चर्याची बाब म्हणजे प्रत्येक तीनपैकी एका व्यक्तीमध्ये या मध्यम धमन्या लुप्त होत नाहीत. उलट अशा लोकांच्या शरीरात दोनऐवजी तीन रक्तवाहिन्या सापडल्या आहेत. हेनबर्ग म्हणतात की तिसऱ्या धमनीचा काही फायदा होणार नाही असे म्हटले जावू शकत नाही. पण त्याचे तोटेही नाहीत, त्याचवेळी माणसांमधील अक्कलदाढ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याविषयी बोलताना ऑस्ट्रेलायाच्या फ्लिंडर्स युनिव्हर्सिटीच डॉ. तेघन लुकास म्हणतात की माणसाचे तोंड लहान होत आहे. अशा परिस्थितीत अक्कल दाढेला जागा उरत नाही. खाण्यापिण्याच्या सवयीतील बदलांमुळे ती नामशेषही होत आहे.