स्टंटबाज अखेर गजाआड; सोशल मीडियावर वायरल झाला होता व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांदिवली येथील इमारतीच्या 23 व्या मजल्यावरून धोकादायक स्टंट केल्याप्रकरणी नॉर्मन डिसोजा, ईशवराज कोबलकर आणि सदाम शेखला कांदिवली पोलिसांनी अटक केली. तो स्टंट नॉर्मन डिसोजाने केला होता.

सदाम डान्सर असून तो कांदिवलीच्या लालजी पाडा परिसरात राहतो. काही दिवसांपूर्वी सदाम, नॉर्मन आणि ईश्वरराज हे तिघे इमारतीच्या 23 व्या मजल्यावर गेले. नॉर्मन हा 23 मजल्यावरील काठावर गेला. त्याने दोन्ही हातावर संपूर्ण शरीराचा तोल टाकून पाय वर करत काळजाचा ठोका चुकवणारा स्टंट केला. तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओची दखल कांदिवली पोलिसांनी घेतली. पोलीस निरीक्षक रवी अडाणे पथकाने तपास सुरु केला. तो व्हिडीओ लालजी पाडा येथील जय भारत सोसायटीच्या 23 व्या मजल्यावरून काढल्याचे समोर आले. पोलिसांनी ईश्वरराज आणि नॉर्मनला ताब्यात घेतले. चौकशीत नॉर्मनने स्टंट केल्याची पोलिसांना कबुली दिली. परदेशी स्टंट कलाकाराकडूंन प्रेरित होऊन स्टंट केला.